कशास जावे उगा मंदीरी?
हृदय-शिंपली मध्ये ठेवले
जपून मी दु:खाचे मोती..
वेड्या मना, तू हास जरा
अशीच असते ही प्रिती..
काळोखाची वाट जरी ही
बिकट वळणे, ही सामोरी..
प्रकाशरेखा हृदयामधली
उजळून टाकील सृष्टी सारी..
नजरेमध्ये पाणी कधी ना,
विश्वासाला दे जागा..
उसवल्या जखमा सार्या
शिवेल प्रितीचा धागा..
स्मरूनी घे पुन्हा पुन्हा
उत्कट क्षण ते सौख्याचे..
मिटून डोळे दर्शन घे अन
मूर्त तुझ्याच प्रेमाचे..
ज्योत तेवती अखंड राहो
तुझ्या माझ्या हृदयांतरी..
तुझ्याच ठायी ईश पहावा
कशास जावे उगा मंदीरी?..
- प्राजु
2 प्रतिसाद:
sahi zali aahe!
khupach chan!! ani overall sagla bolg ani mandani khupach sundar ahe!!
Regards
Kedar
टिप्पणी पोस्ट करा