अबोल ताटवा..
झाकला मी लोचनांत पौणिमेचा चांदवा
आज ओंजळीत घेत चांदण्यांचा थवा..
स्वप्न स्वप्नं खेळता कशास आसवे हवी
आसपास बोलते नवी नव्हाळी पालवी
नूर माझिया मना भासतो नवा नवा
आज ओंजळीत घेत चांदण्यांचा थवा ..
सांज टेकता नभास,आस लागते मना
रात गर्भी जन्मूनी उषा हसेल ती पुन्हा
चंद्र सूर्य जोडते रात होऊनी दुवा
आज ओंजळीत घेत चांदण्यांचा थवा..
मन फ़ूल देखणे अंतरी उमलले
गंधविभोर जाहले, आसमंती रंगले
दरवळे उरांत खास हा अबोल ताटवा
आज ओंजळीत घेत चांदण्यांचा थवा..
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा