कंकण..
कशी म्हणू मी रिक्त जाहले
माझ्या मनीचे अवघे आंगण
पाऊस सरला तरीही दिसते
पाण्याने भरलेले कंकण
फ़ुलून येते कधीतरी मग
क्वचित होता थोडे शिंपण
आवसेनंतर पुन्हा आकाशी
झळकत राहती चांदणकण
टोचून जाती सुया हजारो
भाळावरती उठते गोंदण
थकले तरीही नाद घुमुनी
थिरकत राही पाऊल-पैंजण
जखमांवरती अलगद होई
तुझ्या सयींचे हळूच लिंपण
पुन्हा पुन्हा मग तशीच होते
श्वासाची श्वासांशी गुंफ़ण
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा