तव गीतातील निषाद..
चहूदिशांतून फ़िरुन तुजला
घालते मी साद रे
सोनुलेसे मन माझे
दे मला प्रतिसाद रे
रुणझुणणार्या पावलांना
तुझ्या प्रीतीचा नाद रे
प्रेमपाखरे गुंजन करती
सांग तू अनुवाद रे
वसंताचा रम्य सोहळा
घे जरा आस्वाद रे
तान छेडली कोकिळ कंठी
दे खुलूनी दाद रे
घुमून आले श्वास माझे
दर्यांत उठले पडसाद रे
वेळूमध्ये घाली रूंजी
तव गीतातील निषाद रे
नको जुने ते धागे दोरे
आणि जुने ते वाद रे
प्रीतमंदीरी रंग भरावे
नको काही प्रमाद रे
गुलमोहोराचा धुंद पसारा
आगळा आल्हाद रे
चल गगनाशी सहज छेडू
आज प्रेम संवाद रे
- प्राजु
2 प्रतिसाद:
रुणझुणणार्या पावलांना
तुझ्या प्रीतीचा नाद रे
प्रेमपाखरे गुंजन करती
सांग तू अनुवाद रे
सुंदर...
रुणझुणणार्या पावलांना
तुझ्या प्रीतीचा नाद रे
प्रेमपाखरे गुंजन करती
सांग तू अनुवाद रे
सुंदर...
टिप्पणी पोस्ट करा