तुझ्या मिठीच्या धुंद सरी
तुझा दुरावा घायाळ करी
ओढ अनावर माझ्या उरी..
उदासवाण्या सायंकाळी
नकोस छेडू आसावरी
आठवताना स्पर्श तुझा
हृदयामध्ये उठे शिरशिरी
देहामध्ये भिनून राही
नाव तुझे रे रूधिरापरी
दिठीमध्ये भाव तुझे अन
गीत तुझे या ओठावरी
चिंब करती पुन्हा पुन्हा मज
तुझ्या मिठीच्या धुंद सरी
बाहूंचा तव आधार दे रे
तुझ्याविना मी अधांतरी
नकोस लोटू दूर कधी मज
घाल इतुके दान पदरी..
- प्राजु
1 प्रतिसाद:
कसं सुचतं गं तुला एवढं? awesome !!
टिप्पणी पोस्ट करा