विश्वरूप व्हावे..
वाटा दवांत भिजल्या, पाऊलही भिजावे
अज्ञात या दिशांना, मी ओंजळीत घ्यावे
आवर्त घेरताना, उठले हजार तांडे
मातीसवे निघूनी , मी त्या नभी रूजावे
पाऊल अंतराळी, गहिरीच वाट सारी
अव्यक्त ओढ इतुकी, मी त्यासही फ़सावे
लाटांसवेच सजली, पाण्यावरील किरणे
तो साज मी रुपेरी, लेऊनिया सजावे
मल्हार बांधलेला, त्या श्रावणी सरींनी
घेऊन कुंचला मी, सतरंग फ़ेसटावे
त्या गूढशा दिशांना, माझा प्रवास ठावे
बांधून चाळ पायी, बेबंध मी फ़िरावे
माझ्याच सावलीचा, घेऊन हात हाती
तोडून बंध सारे, मी विश्वरूप व्हावे
- प्राजु
वृत्त : आनंदकंद
गण : गागालगा लगागा, गागालगा लगागा
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा