वर्तमानाच्या धगीत...
वर्तमानाच्या धगीत सारे वितळत जाते
आठवणींचे मोहोळ अवघे उठवित जाते
दिल्या घेतल्या शपथा आणि वचनांची भाषा
मिटून डोळे पुन्हा पुन्हा, मी आठवित जाते
कधीच नव्हती श्वासांशी त्या माझी सलगी
स्पंद उपरे माझ्या उरी, मी रूजवित जाते
उधार होती स्वप्ने सारि कधी पाहिलेली
तीच स्वप्ने पुन्हा पाहूनी, भिजवीत जाते
धागे सारे विरुन गेले तलम रेशमाचे
विटले काठही जरतारी, मी उसवित जाते
तडा गेल्या मनांस माझ्या भितीच फ़ुटण्याची
टाळुन आरसा मनांस मग मी फ़सवित जाते
रंगमंचहि खुलुन येतो, व्यथाच माझ्या अशा
मूक रूदनही माझे, जगांस हसवित जाते..
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा