ऐश्वर्य वेदनांचे..
नशिबात काय माझ्या, मी सांगतोच आहे
हातावरील रेषा, मी मोजतोच आहे
बोलून सत्य नेहमी, हातात काय आले
शिक्षा खरेपणाची, मी भोगतोच आहे
नौका कधी न गेली, भवर्यात खोल माझी
लाटांस दुर अजूनी, मी लोटतोच आहे
जागेपणीच कळले, स्वप्नांस अर्थ नाही
पण शांत नीज येथे, मी शोधतोच आहे
झाला जरी यशस्वी, मी डाव मांडलेला
आले मनांत अन त्या, मी मोडतोच आहे
दु:खाचि ना कधीही, मजला उणीव भासे
ऐश्वर्य वेदनांचे, मी मागतोच आहे
आधी कधी न झाले, हे भास या मनाला
माझीच प्रेत यात्रा, मी ओढतोच आहे
- प्राजु
वृत्त : आनंदकंद
गण/मात्रा : गागालगा लगागा, गागालगा लगागा
1 प्रतिसाद:
khup sundar gazal
टिप्पणी पोस्ट करा