गूज..
गूज कोणते मनांस माझ्या कळून आले
बघता बघता तळव्यावरूनी उडून गेले
कुठे विसावे, कसे कळावे, मनांस वेड्या
पंख चिमुकले त्याचेही जर भरून आले..?
कधी पाहूनी वनराई ती गार हिरवी
मन गोजिरे फ़ूल झाले, उमलून आले..
उगा पेंगूनी, शांत झोपल्या जळाशयी त्या
तरंगापरी मनाचेही मग फ़िरून झाले..
कधी नभाशी कधी फ़ुलाशी गोड हासूनी
इंद्रधनूच्या झुल्यावरती झुलून झाले..
गोड गुलाबी फ़ुंकर घाली कोण मनावर
रक्तिम गाली, लाजलाजूनी खुलून आले..
- प्राजु
2 प्रतिसाद:
mast!
कधी पाहूनी वनराई ती गार हिरवी
मन गोजिरे फ़ूल झाले, उमलून आले..
उगा पेंगूनी, शांत झोपल्या जळाशयी त्या
तरंगापरी मनाचेही मग फ़िरून झाले..
कधी नभाशी कधी फ़ुलाशी गोड हासूनी
इंद्रधनूच्या झुल्यावरती झुलून झाले..
गोड गुलाबी फ़ुंकर घाली कोण मनावर
रक्तिम गाली, लाजलाजूनी खुलून आले..
ह्या द्विपदींमधल्या कल्पना सुरेख... अप्रतिम... खुप आवडल्या
...वा वा खुप सुंदर !
टिप्पणी पोस्ट करा