कधी कधी..
प्रेमवेडी ती नजर मी टाळते कधी कधी
अन तरीही का तुझ्यावर भाळते कधी कधी??
आर्जवांना मी तुझ्या नाकारले पुन्हा पुन्हा
शब्द तुजला का दिलेला पाळते कधी कधी?
बोलण्याने जिंकते मी मैफ़िली हजारदा
बोलताना भानही सांभाळते कधी कधी..
सांगताना ती कहाणी आपुली जगांस या
पण तुझे रे नाव मी ही गाळते कधी कधी..
ही जगाची रीत न्यारी रोखते मला जरी
गुंफ़ली तू प्रेमसुमने माळते कधी कधी..
प्रेम नाही व्यक्त केले मी जरी तुझ्या पुढे
तव सयीने या जीवाला जाळते कधी कधी..
- प्राजु
4 प्रतिसाद:
surekh! khoop aavadali.
chhaan aahe..
Apratim...!!
खुप खुप आवडली...
टिप्पणी पोस्ट करा