तुझ्या डोळ्यातील साज..
तुझ्या डोळ्यातील साज, जशी सागराची गाज
तुझ्या शब्दातला बाज, माझ्या ओठावरी लाज..
तुझी आर्जवेही धुंद, जसा प्राजक्ताचा गंध
किती उठावे तरंग, शहारले अंग अंग
मन पाखरू पाखरू, तुझे आभाळ मोकळे
शब्दाशब्दा सवे तुझ्या, मन माझे दूर गेले..
दर्पणात पाहताना, आठवांत तुझ्या चिंब
शोधू कुठे माझे मी गं, गवसेना प्रतिबिंब..
गंधाळते हवा सारी , तुझी लागता चाहूल
मन पुन्हा सैरभैर, आणि उरात काहूर..
तुझ्या प्रेमात नाहते, तुला स्वप्नांत पाहते
तुझ्या सयीत वाहते, संगे तुझ्याच राहते..
- प्राजु
1 प्रतिसाद:
तुझी आर्जवेही धुंद, जसा प्राजक्ताचा गंध
किती उठावे तरंग, शहारले अंग अंग
सुंदर...
टिप्पणी पोस्ट करा