दिपोत्सवाचे रंग..
धूसर झाल्या नभी तारका
आसमंती बेहोष हिवाळी
मेहंदी रंगल्या सोनपाऊली
पहाट घेऊन येई दिवाळी
मंद तेवते दीप अंगणी
जणू नक्षत्रे उतरून आली,
रंग माखूनी अंगावरती,
जमीन सारी भरून गेली..
मंद सुगंधी अभ्यंगातून
धुंद काया होत सकाळी
चंदन गंधी मुग्ध न्हाऊनी
यौवनास या नवी झळाळी..
रूणझुण पैजण कर्णफ़ुले अन
सुवर्णमाला गळा ल्यायली
निळ्या जांभळ्या गर्भ रेशमी
वस्त्रांकित ही तनू बावरी..
बिंदी रेखूनी भाळावरती
काजळरेखा नयनी आली
साज सोवळा लेऊन दर्पणी
लज्जित बाला रूप न्याहाळी
क्षणैक नजरानजर होऊनी
शृंगाराची मिळे पावती
लाजलाजली रूपगर्विता
दिपोत्सवाचे रंग हासती..
- प्राजु
2 प्रतिसाद:
Praju
Hi Kavita vachun man agadi bhuta kalat gele. Khup chan lhihiles, lahanpanachi DIWALI aathavali bhag.
From-- Aniket Sonawane
सुरेख
टिप्पणी पोस्ट करा