ती..!
तारूण्याच्या वाटेवर ती भेटली होती
घेउनी जवळी शब्द दिले तिने माझ्या हाती..
नभानभातून फ़िरून येता मला उमगले
ओंजळ माझी चंद्र कणांनी भरली होती..
गवतावरच्या दवांस मीही हळूच पुसले
"शब्द तुझे हे कसे उमलूनी झाले मोती??"..
लेउनी प्रतिभा रथ किरणांचा धावत येता
शब्द लालिमा भाळी तिचीया माखली होती..
सृष्टीमधूनी स्वैर मजला सैर घडविते
प्रतिमांचाही खजिना देते माझ्या हाती..
सफ़ेद मोती जसे गुंफ़ले लडीत मनीच्या
अक्षरातूनी शब्द शब्द मग जुळून येती..
माप मनाचे ओलांडुनी ती प्रवेश करते
येते कविता वधू होऊनी माझ्यासाठी..
रंग आगळा आयुष्याचा मला दावते
जगण्याला मग पूर्णत्वाची येते प्रचिती..
- प्राजू
2 प्रतिसाद:
sundar aahe...
ती..! - खुप सुंदर...
नभानभातून फ़िरून येता मला उमगले
ओंजळ माझी चंद्र कणांनी भरली होती.. - किती सुंदर कल्पना वा !
सफ़ेद मोती जसे गुंफ़ले लडीत मनीच्या
अक्षरातूनी शब्द शब्द मग जुळून येती.. - अप्रतिम, अतिशय सुंदर
रंग आगळा आयुष्याचा मला दावते
जगण्याला मग पूर्णत्वाची येते प्रचिती.. - खरच !
टिप्पणी पोस्ट करा