ओंकार
मानवाच्या अस्तित्वाची आज ही ललकार आहे
का मख्मली आयुष्याची फ़ाटली जरतार आहे
का जगावे रोज येथे, हे किडेमुंग्यांपरी तू
झेलसी अन्याय मनुजा, रे तुझा धिक्कार आहे
हो सिद्ध नि घे मशाली, वाट काढू सोबतीने
षडरिपूंचा सर्प काळा, टाकतो फ़ुत्कार आहे
घे भरारी तू अकाशी , सांग तुजला भय कशाचे
पेटवूनी दे नभाला, माजला अंधार आहे..
या जगाच्या रीत भाती, सोडुनी दे आज सार्या
खाच खळग्यांनीच भरला मार्ग, क्षितिजा पार आहे
अंतरी या आज घ्यावे, तेज सारे रविकराचे
लख्ख सारे विश्व करुनी द्यायचा, निर्धार आहे
बीज आशेचे उद्याच्या, पेरण्या तू हो समर्थऽ
ऐक वेड्या त्या उद्याचा, गुंजतो ओंकार आहे
- प्राजु
1 प्रतिसाद:
baryach diwasaanni veer-rasavaril changali kavita vachayala milali.
टिप्पणी पोस्ट करा