भिंगोरी..
क्षणांत खाली क्षणांत वरती
श्वास झुलतो झुल्यावरी
आभासांच्या मागे भिरभिर
मन झाले गं भिंगोरी..
खळबळ मनांत धडधड उरांत
चाहूल ही हृदयांतरी
कधी आकाशी कधी जळाशी
पाऊल माझे अधांतरी
कशी आवरू कशी सावरू
साद घालते कुणीतरी
क्षणांत येथे क्षणांत तेथे
चित्त नसे थार्यावरी
किती करावे नवे बहाणे
नशा चढावी मनावरी
उगा रूसावे उगा हसावे
राग लटका कधीतरी
ओढ लागुनी स्पंद रूजावे
माझ्या उरीचे तुझ्या उरी
सोन स्वरांनी गीत सजावे
प्रित फ़ुलावी जन्मांतरी
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा