रसरंग..
धुंदीत प्रिया ही बेधुंदी
ओठात तुझ्या ही मधुगंधी
रेशिम गीत प्रितीचे रे
तू गात रहा...
स्वप्नांत तुझ्या मी जगते
हृदयांत तुला आळवते
ओठातही गुणगुणते
तव गीत पहा...
हा स्पर्श गुलाबी हसरा
श्वासात कंप लाजरा
जाईचा माळिला गजरा
घे गंध आहा!
गंध ल्यायली मी शर्वरी
ओठीची तुझिया मी पावरी
छेडूनीया आसावरी
रसरंग पहा..
- प्राजु
1 प्रतिसाद:
surel premgeet.
टिप्पणी पोस्ट करा