सय तुझी जळेना..
काव्यात गुंफ़वावे का शब्द हे जुळेना
गीतात आळवावे, मज सूर ते मिळेना
भेटीस सागराच्या, आतूर ती दिवाणी
का प्रीत निर्झराची, प्रितमेस त्या कळेना
गेला निघून सारा, दिन हा उदासवाणा
हुरहूर लावणारी ही सांज का टळेना
काठावरीच भिजली, स्वप्ने अपूर्ण सारी
नयनांत आस दाटे, पण पापणी ढळेना
जाळून राख केल्या, सार्या खुणा सुगंधी
पण का उरात रूतली, ही सय तुझी जळेना
वाहून दूर गेली, पाण्यात राख माझी
मोक्षाकडे अजूनी आत्मा कसा वळेना..
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा