नजरा..!!
सार्याच ओळखीच्या दिसतात रोज नजरा
देहावरी तरी या, उरतात रोज नजरा..
आहेत वागण्याचे, रीती-रिवाज सारे
नियमांत कोणत्या, ह्या बसतात रोज नजरा?..
बिनघोर वागण्याची, मजला मुभाच नाही!
बुरख्यात मैतरीच्या, डसतात रोज नजरा ..
मूर्तीस मंदिराच्या, वसने अनेक उंची
नारीस नागवी या, करतात रोज नजरा..
"तू विश्वकारिणी!", हे वदला जगन्नियंता
उपभोग्य 'मान' माझा, वदतात रोज नजरा..
शापीत जन्म माझा, टाळू तरी किती मी
होऊनिया गिधाडे, फ़िरतात रोज नजरा..
बाजार वासनेचा, आसक्त स्पर्श सारे
ओंगळ हिडीस सार्या, असतात रोज नजरा..
नाजूकशी कळीही, तोडून कुस्करावी
बेशर्म पाशवी या , छळतात रोज नजरा..
झगडून मी जपावे , अस्तित्व रोज माझे
माझ्या असाह्यतेला, हसतात रोज नजरा..
माझी व्यथाच कोणी, का आपली म्हणावी??
विश्वास वाटणार्या, नसतात रोज नजरा..
- प्राजु
9 प्रतिसाद:
मूर्तीस मंदिराच्या, वसने अनेक उंची
नारीस नागवी या, करतात रोज नजरा >>
हे अनावृत्त सत्य आहेच. निर्विवाद.
तरीही,
नारीस शोधणार्या, असतात कैक नजरा
सार्याच नावडीच्या, असतात काय नजरा?
कविता सामाजिक वैगुण्यावर नेमके बोट ठेवते आहे.
मात्र, कवीचे कौशल्य समस्येपेक्षा समाधानाच्या अभिव्यक्तीत प्रकट होणेच जास्त श्रेयस्कर आहे.
अर्थात, एवढ्या नेमकेपणाने आकलनास अभिव्यक्त करायला जमणेही काही थोडे नाही.
सुरस कवितेखातर हार्दिक अभिनंदन!
नरेंद्र गोळे २००९०५०६
Utkraantichyaa vaatevarti
ardhe-murdhe vechale maanus-pan
antarichya pashu-laa
hey samjaavanaar kon!!
Buddhi, sanskriti,maanavata
nusatyaa saaryaa bhampak vaarta!!
Dhad maanus naahi an PRAANI hi nahi!!
bhog vedana tutale panachi
yugan-yuge zurata zurata !!!
'NAJARA' ha apratim KAAVYA-NAJARA-NA aahe. Truth is bitter, but ultimately it's nothing but truth.
Are maanasa, maanasaa kadhi hoshil rey maanus! ha mulbhut prashna-cha, hya kavitechyaa aashayaatun adhorekhit hoto. Var var sabhya-pratishthit disnaari,navhe chehryaa-var sadaiv saatvik bhaav gheun vaavarnaari anek sajjan mandali, parighaa-chya baher, striyaan barobar kase vartan kartaat , chorte kataksh, anglat-la jane etc. ha abhyasnya joga vishay aahe.
So your poem is perfectly spotting the weakness of our society
najara
khu sundar ani marmik kavita. awadli khari aahe shankach nahi murtis mandirachya vasane anek unchi he kadv far bhavl
फारच सुंदर गझल..!! काही वेदना ना-इलाजी असतात आणि अशा वेदनांवर वेदनाशामके पण काम करित नाहीत.प्रवाह बदलण्याचे अचाट सामर्थ्य तरी कुठे असते? सर्व कठीनच. पण शब्दशराने त्या नजरांना घायाळ, पराभुत करण्याचे कौशल्य या अद्भुत गझलेने निर्विवाद साधले आहे.
फारच सुंदर गझल..!! काही वेदना ना-इलाजी असतात आणि अशा वेदनांवर वेदनाशामके पण काम करित नाहीत.प्रवाह बदलण्याचे अचाट सामर्थ्य तरी कुठे असते? सर्व कठीनच. पण शब्दशराने त्या नजरांना घायाळ, पराभुत करण्याचे कौशल्य या अद्भुत गझलेने निर्विवाद साधले आहे.
अस्सल गझलियतचे एक उत्तम उदाहरण... दांभिकतेचे सगळे बुरखे फाडणारी रचना
-मानस६
नमस्कार,
http://www.baliraja.com/my_choice माझी आवड
या लिंकवर मी माझ्या अत्यंत आवडीच्या निवडक गझल आणि शेतकरी गीतांचे संकलन करतोय.
त्यात तुमची "नजरा" ही गझल प्रकाशीत करायची आहे.
कृपया आपली अनुमती द्यावी. :)
अनुमतीबद्दल धन्यवाद.
http://www.baliraja.com/node/480
टिप्पणी पोस्ट करा