कशी ही हिंडती दु:खे
कधी येथे कधी तेथे कशी ही हिंडती दु:खे
फिरत होती म्हणे माझ्या घराच्या भोवती दु:खे
फिरत होती म्हणे माझ्या घराच्या भोवती दु:खे
उपेक्षा अन निराशेची घुटी दररोज चाखूनी
व्यथेला बाळसे धरते, तिला गोंजारती दु:खे
व्यथेला बाळसे धरते, तिला गोंजारती दु:खे
कधी ना वाटते भय कोणतेही वा कुणाचेही
जिथे जाते तिथे असतात माझ्या सोबती दु:खे
जिथे जाते तिथे असतात माझ्या सोबती दु:खे
नसो पैसा नसो घरदार त्यांना ना तमा कसली..
पहा पडक्या घरी माझ्या सुखाने नांदती दु:खे
पहा पडक्या घरी माझ्या सुखाने नांदती दु:खे
फिरूनी ताटव्यावरती सुखाच्या, होत मधमाशी
कधी आनंदही हळवा जरासा शोषती दु:खे
कधी आनंदही हळवा जरासा शोषती दु:खे
कधी थकतात ना दमतात, सरते जिंदगी सारी
सुखाचे भव्य इमले पाडती अन बांधती दु:खे
सुखाचे भव्य इमले पाडती अन बांधती दु:खे
कधी आलेच दारी सौख्य आनंदून जाती अन
लगेचच दृष्ट काढाया व्यथेला आणती दु:खे
लगेचच दृष्ट काढाया व्यथेला आणती दु:खे
-प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा