मी शोधते सुखाच्या खाणाखुणा नव्याने...
मी शोधते सुखाच्या खाणाखुणा नव्याने
माझ्याच जीवनाची चाळून सर्व पाने
मज बोलवू नको तू, होईल भंग मैफ़िल
लिहिलेत शब्द माझे, मी तप्तशा शिस्याने
पाऊसही समंजस झाला अता तरीही
'अंकुरणार ना मी" केलाय पण बीजाने
मजपास एकही ना उरलेय स्वप्न आता
घेते विकत जरा मी, थाटा कुणी दुकाने!
जगण्यास या कळेना, 'जगणे' म्हणू अता की
मोजूनिया दिसांचे , भरतेय मी रकाने?
'प्राजू' पतिव्रतेचे , जपतेस व्रत इथे तू
पण त्या वडास शिक्षा, वाटे तुझ्या व्रताने
-प्राजु
माझ्याच जीवनाची चाळून सर्व पाने
मज बोलवू नको तू, होईल भंग मैफ़िल
लिहिलेत शब्द माझे, मी तप्तशा शिस्याने
पाऊसही समंजस झाला अता तरीही
'अंकुरणार ना मी" केलाय पण बीजाने
मजपास एकही ना उरलेय स्वप्न आता
घेते विकत जरा मी, थाटा कुणी दुकाने!
जगण्यास या कळेना, 'जगणे' म्हणू अता की
मोजूनिया दिसांचे , भरतेय मी रकाने?
'प्राजू' पतिव्रतेचे , जपतेस व्रत इथे तू
पण त्या वडास शिक्षा, वाटे तुझ्या व्रताने
-प्राजु
1 प्रतिसाद:
छान आहे .
टिप्पणी पोस्ट करा