....सखी साजणी
इथे दरवळूनी तिचा गंध आला उडू लागली का तिची ओढणी?
सुखाची जणू देत चाहूल माझी पहा येत आहे सखी साजणी
फ़ुलांनी जणू मागुनी घेतलेली, लकाकी उन्हाच्याकडे आगळी
निळ्या आसमंती, निळ्या अंबराने, पहा रेखली आज नक्षी निळी
तिच्या स्वागताला सवे आज माझ्या दिशा सर्व धावून आल्या झणी

तिची गौर काया, भुरे केस, गाली पडावी अशी जीवघेणी खळी
म्हणू मी उषा की निशा चांदवर्खी, म्हणू का तिला सांज मी सोवळी
धुक्याने जणू माखलेली प्रभा ती, हळू अवतरावी जशी अंगणी

अता स्वप्न साकार होणार माझे, प्रचीती जणू येत आहे मला
तिच्या पैजणांचा खुळा नाद हृदयी कसा स्पंद होऊनिया रंगला
इथे प्राण सारे पहा एक झाले, तिला पाहण्या माझिया लोचनी

- प्राजु

0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा