......अज्ञान पावसाचे
गाऊ नको जराही, गुणगान पावसाचे
बाहेर बघ जरा तू, थैमान पावसाचे
बाहेर बघ जरा तू, थैमान पावसाचे
वाहून गाव गेले..! तरिही नभात अजुनी
आहे बरेच शिल्लक.. सामान पावसाचे!
आहे बरेच शिल्लक.. सामान पावसाचे!
गळली पिके उभ्याने, शेतात नांदणारी
तरिही कसे गळेना अवसान पावसाचे?
तरिही कसे गळेना अवसान पावसाचे?
कोठे किती झरावे, ठाऊक त्यास नाही
होईल दूर केव्हा, अज्ञान पावसाचे?
होईल दूर केव्हा, अज्ञान पावसाचे?
ओला नि कोरडाही, दुष्काळ हा नशीबी
चुकतेच नेहमी का अनुमान पावसाचे?
चुकतेच नेहमी का अनुमान पावसाचे?
भिजलीस ना जराही, त्याच्यासवे म्हणूनी
झालेय केवढे बघ, नुकसान पावसाचे!
झालेय केवढे बघ, नुकसान पावसाचे!
बाहेर तू अवेळी , जाऊ नकोस 'प्राजू'
भलतेच बघ इरादे, बेभान पावसाचे!
भलतेच बघ इरादे, बेभान पावसाचे!
-प्राजु
1 प्रतिसाद:
सुरेख !!!
टिप्पणी पोस्ट करा