वस्त्र सौख्याचे उधारीने मिळाले
चांदण्याची शाल मी ओढून घेते
ये तुला.. माझ्यात सामावून घेते
---------------------------------
शाल स्वप्नांची जरा ओढून घेते
जीवनाला त्यात गुंडाळून घेते
श्वास होते धाडले तुजपास काही
जे परत आलेत ते मोजून घेते..
फ़ाटुनी जाईल ते .. या काळजीने
मीच जगण्याला जरा टाचून घेते..
आठवे घेऊन तोंडी लावण्याला
गोड मी जगणे अता मानून घेते
वस्त्र सौख्याचे उधारीने मिळाले
चापुनीचोपून त्या नेसून घेते
पाहिला नाही 'उद्या' कोणीच येथे
'आज'ची स्मरणे उरी गोंदून घेते
- प्राजु
ये तुला.. माझ्यात सामावून घेते
---------------------------------
शाल स्वप्नांची जरा ओढून घेते
जीवनाला त्यात गुंडाळून घेते
श्वास होते धाडले तुजपास काही
जे परत आलेत ते मोजून घेते..
फ़ाटुनी जाईल ते .. या काळजीने
मीच जगण्याला जरा टाचून घेते..
आठवे घेऊन तोंडी लावण्याला
गोड मी जगणे अता मानून घेते
वस्त्र सौख्याचे उधारीने मिळाले
चापुनीचोपून त्या नेसून घेते
पाहिला नाही 'उद्या' कोणीच येथे
'आज'ची स्मरणे उरी गोंदून घेते
- प्राजु
1 प्रतिसाद:
Mast
टिप्पणी पोस्ट करा