सख्या पांडुरंगा..
विठ्ठलाचे नाम, घुमे पंढरीत
नाचती वारीत, भक्तगण
वेड त्याचे ऐसे, दुजे भान नाही
जथ्था हो प्रवाही, हरीकडे
सख्या पांडुरंगा, मनी प्रश्न चिन्ह
रुपे किती भिन्न, तुझी राया..
तुझ्या गारुडात, विसरले भान
भूक नि तहान, दिन रात
एकदाची या हो, द्यायाला दर्शन
गुढ्या नि तोरण, बांधियले
प्राजक्ताची फ़ुले, चरणी वाहून
'गोड घ्या मानून!', विनविते
-प्राजु
नाचती वारीत, भक्तगण
वेड त्याचे ऐसे, दुजे भान नाही
जथ्था हो प्रवाही, हरीकडे
सख्या पांडुरंगा, मनी प्रश्न चिन्ह
रुपे किती भिन्न, तुझी राया..
तुझ्या गारुडात, विसरले भान
भूक नि तहान, दिन रात
एकदाची या हो, द्यायाला दर्शन
गुढ्या नि तोरण, बांधियले
प्राजक्ताची फ़ुले, चरणी वाहून
'गोड घ्या मानून!', विनविते
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा