जाग नावाला तुझ्या निर्धार कर बरसायचा
जाग नावाला तुझ्या निर्धार कर बरसायचा
सोड मेघा छंद मातीला असा झुलवायचा
चेहरा सांगे तुझा सारी खुशाली पण तरी
काय डोळे यत्न करती वेगळे सांगायचा?
तूच चोथ्याला जगाच्या टाळले कंटाळुनी
सांगना 'काळा' तुझा घाणा कुणी फ़िरवायचा?
राग लटका का तुला कळलाच ना माझा कधी?
यत्न सुद्धा ना कधी केलास तू मनवायचा!!
तू नको वाईट वाटूनी असा घेऊ मना
घे जरा अनुभव तुही काहीतरी गमवायचा
प्राक्तना रुसशील माझ्यावर किती तूही असा?
घेतला आहे वसा मीही तुला हसवायचा
जीवनाच्या याच पाटीवर नव्याने चल मना
संयमाचाही धडा आहे अता गिरवायचा..
-प्राजु
सोड मेघा छंद मातीला असा झुलवायचा
चेहरा सांगे तुझा सारी खुशाली पण तरी
काय डोळे यत्न करती वेगळे सांगायचा?
तूच चोथ्याला जगाच्या टाळले कंटाळुनी
सांगना 'काळा' तुझा घाणा कुणी फ़िरवायचा?
राग लटका का तुला कळलाच ना माझा कधी?
यत्न सुद्धा ना कधी केलास तू मनवायचा!!
तू नको वाईट वाटूनी असा घेऊ मना
घे जरा अनुभव तुही काहीतरी गमवायचा
प्राक्तना रुसशील माझ्यावर किती तूही असा?
घेतला आहे वसा मीही तुला हसवायचा
जीवनाच्या याच पाटीवर नव्याने चल मना
संयमाचाही धडा आहे अता गिरवायचा..
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा