सभोवताली होती हिरवळ स्वप्नांची
सभोवताली होती हिरवळ स्वप्नांची
आता वाटे उगाच अडगळ स्वप्नांची
देहामध्ये वहात होती स्वप्ने अन
जखम जराशीच... आणि भळभळ स्वप्नांची!
स्वप्न नेसते स्वप्नच खाते-पिते सुधा
असते चालू नुसती चंगळ स्वप्नांची
किती लपेटू तरी हुडहुडी भरते का?
जणू फ़ाटकी माझी वाकळ स्वप्नांची!
सत्याची गंभिरता ना त्यांच्या अंगी
अखंड चालू असते खळखळ स्वप्नांची!
हलका वारा येता कडकड तुटते बघ
तुझी डहाळी इतकी पोकळ स्वप्नांची!
वास्तवातही आणू 'प्राजू' स्वप्ने अन
लिहूच गाथा तुझ्याच मंगळ स्वप्नांची
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा