घेतले फ़ुलायचे नवीन खूळ मी
घेतले फ़ुलायचे नवीन खूळ मी
थुंकला शिशीर अन भरुन चूळ मी
मोगरा तुलाच ठेव ठेंगणा तुझा
माळते विशाल धुंदला बकूळ मी
काच होउनी समोर राहिले जरी
वाटले तुला, असेन का ठिसूळ मी??
न्हाउनी पवित्र जाहलास तूच अन
वाटते तुलाच जाहले गढूळ मी??
काय वागले जरा रिवाज सोडुनी
बुडविली म्हणे परंपरा नि कूळ मी!
रूप चंडिकाच मी अखेर! जाण तू
दैत्य मारण्यास घेतले त्रिशूळ मी
सोड हा विचार, देव तू न राहिला
आणि राहिले तुझी न चरणधूळ मी
- प्राजु
थुंकला शिशीर अन भरुन चूळ मी
मोगरा तुलाच ठेव ठेंगणा तुझा
माळते विशाल धुंदला बकूळ मी
काच होउनी समोर राहिले जरी
वाटले तुला, असेन का ठिसूळ मी??
न्हाउनी पवित्र जाहलास तूच अन
वाटते तुलाच जाहले गढूळ मी??
काय वागले जरा रिवाज सोडुनी
बुडविली म्हणे परंपरा नि कूळ मी!
रूप चंडिकाच मी अखेर! जाण तू
दैत्य मारण्यास घेतले त्रिशूळ मी
सोड हा विचार, देव तू न राहिला
आणि राहिले तुझी न चरणधूळ मी
- प्राजु
1 प्रतिसाद:
aawadli khup chan aahe
टिप्पणी पोस्ट करा