उत्तरादाखल तुझे अश्रू कसे रे सांडले?
दूरचे पर्वत बघाया जीव तोडुन धावले
अंगणी दव सांडलेले का कसे मी टाळले?
मुखवटे आहेत नुसते बेगडी चोहीकडे
ते जुने निष्पाप सारे चेहरे का लोपले?
भेटले नाहीत हक्काचे असे खांदे तया
शेवटाला चार जण शेजारचे आले भले
चाललो असतो सवे तर वाट असती देखणी
पण अता काट्याकुट्यांना मानले मी आपले
संकटाच्या पार नेण्या धावुनी आलास 'तू'
आणि बघ अस्तित्व मी होते तुझे नाकारले!!
जाणती डोळे तुझे की, मौन माझे बोलके?
उत्तरादाखल तुझे अश्रू कसे रे सांडले?
-प्राजु
अंगणी दव सांडलेले का कसे मी टाळले?
मुखवटे आहेत नुसते बेगडी चोहीकडे
ते जुने निष्पाप सारे चेहरे का लोपले?
भेटले नाहीत हक्काचे असे खांदे तया
शेवटाला चार जण शेजारचे आले भले
चाललो असतो सवे तर वाट असती देखणी
पण अता काट्याकुट्यांना मानले मी आपले
संकटाच्या पार नेण्या धावुनी आलास 'तू'
आणि बघ अस्तित्व मी होते तुझे नाकारले!!
जाणती डोळे तुझे की, मौन माझे बोलके?
उत्तरादाखल तुझे अश्रू कसे रे सांडले?
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा