. जगून घे जरा
प्राक्तनाचा फ़ोड कातळ.. रुजून घे जरा
भीड, चिंता सोड तळमळ... जगून घे जरा
भीड, चिंता सोड तळमळ... जगून घे जरा
पावसाळे वा उन्हाळे.. नको तुला तमा
वाटले आता भिजावे.. भिजून घे जरा
वाटले आता भिजावे.. भिजून घे जरा
भाळणे हा धर्म आहे.. मना तुझा खरा
सोड अब्रूचे बहाणे.. फ़सून घे जरा
सोड अब्रूचे बहाणे.. फ़सून घे जरा
जीवना चढली तुला का.. जगायची नशा?
सांड थोडी, ओत थोडी... अजून घे जरा
सांड थोडी, ओत थोडी... अजून घे जरा
मोगरा प्राजक्त जाई.. जुईच का म्हणे??
होत कोरंटी, अबोली.. फ़ुलून घे जरा
होत कोरंटी, अबोली.. फ़ुलून घे जरा
वाट काट्यांची निवड अन.. असाच चाल पण
सावली दिसताच तेथे.. निजून घे जरा
सावली दिसताच तेथे.. निजून घे जरा
वय कशाला आड यावे.. सजा-धजायला
माळ गजरा, रेख काजळ.. सजून घे जरा
माळ गजरा, रेख काजळ.. सजून घे जरा
ओढुनी आकाश थोडे.. निशा व चंद्र घे
चांदणे माझ्यात आहे... लुटून घे जरा...
चांदणे माझ्यात आहे... लुटून घे जरा...
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा