नको ना सये तू अशी रागवू
नको ना सये तू अशी रागवू
कितीदा असा मी तुला आर्जवू
कधी भेट होताच माझी तुझी
जरा साठवू, अन पुढे आठवू
पकडताच चोरी कुणी आपुली
परीचय न काही असे भासवू
नको पावसाळा नको मोरही
मनाचे पिसारे मनी नाचवू
तुझे भाळ आकाश वाटे खुले
नशीबास सुंदर तिथे रंगवू
किती राग 'प्राजू' तुझ्या लोचनी
बिहागास* ये ना अता आळवू
-प्राजु
*बिहाग : शास्त्रीय संगीतातला एक शृंगारीक राग
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा