आज माझ्या वेदनेला
भास की कसले इशारे आज माझ्या वेदनेला?
का पुन्हा फ़ुटती धुमारे आज माझ्या वेदनेला
या इथे की त्या तिथे काही कळेना काय बघते!
कोणते दिसतात तारे आज माझ्या वेदनेला?
खारवूनी स्वप्न माझे घातले थैमान यांनी
का अता छळतात वारे आज माझ्या वेदनेला
ती उसळते होत लाव्हा खोल हृदयातून वरती
ना कुणीही रोखणारे आज माझ्या वेदनेला
भूतकाळाचे तिला ना प्राक्तनाचे वावडे पण
वर्तमानाचे शहारे आज माझ्या वेदनेला
मी तिला सुंदर सखी म्हटले जरासे आणि आता
रोमरोमावर पिसारे आज माझ्या वेदनेला
तू अता समजाव 'प्राजू' वेदनेच्या या मनाला
ना कुणी जोजावणारे आज माझ्या वेदनेला
-प्राजु
का अता छळतात वारे आज माझ्या वेदनेला
ती उसळते होत लाव्हा खोल हृदयातून वरती
ना कुणीही रोखणारे आज माझ्या वेदनेला
भूतकाळाचे तिला ना प्राक्तनाचे वावडे पण
वर्तमानाचे शहारे आज माझ्या वेदनेला
मी तिला सुंदर सखी म्हटले जरासे आणि आता
रोमरोमावर पिसारे आज माझ्या वेदनेला
तू अता समजाव 'प्राजू' वेदनेच्या या मनाला
ना कुणी जोजावणारे आज माझ्या वेदनेला
-प्राजु
1 प्रतिसाद:
sundar.
टिप्पणी पोस्ट करा