वर ढग डवरले
वर ढग डवरले, गहिवर आभाळाला
क्षितिजाच्या कागदाला, काजळीची चित्रमाला
वर ढग डवरले, वारा भणभण खुळा
आता होणार गं ओला, हिरवासा पर्ण-शेला
वर ढग डवरले, पेलवेना घनभार
डोंगराच्या माथ्यावर, विसावू दे हळूवार
वर ढग डवरले, आता कोसळ होईल
नभ मल्हार गाईल, अंग अंग मोहरेल..
वर ढग डवरले, स्वप्न डोळ्यात उद्याचे
रूप साजर्या घराचे, सुखावल्या अंगणाचे
वर ढग डवरले..... कुठे गेले...??
वर ढग डरवले.. आता दिसेनात कुठे
स्वप्न सारे झाले खोटे.. ओघळले डोळ्यावाटे
वर ढग डवरले... आता आभासच फ़क्त
सार्या नभातुन मुक्त, झाले आभाळ विरक्त??
वर ढग डवरले, वाजे कोरडा नगारा
कसा भेगाळ नजारा, त्यात दुष्काळी पहारा
वर ढग डवरले, आणि डोळ्यात टिपूस
नको अंत तू पाहूस, आता धाड ना पाऊस!
-प्राजु
क्षितिजाच्या कागदाला, काजळीची चित्रमाला
वर ढग डवरले, वारा भणभण खुळा
आता होणार गं ओला, हिरवासा पर्ण-शेला
वर ढग डवरले, पेलवेना घनभार
डोंगराच्या माथ्यावर, विसावू दे हळूवार
वर ढग डवरले, आता कोसळ होईल
नभ मल्हार गाईल, अंग अंग मोहरेल..
वर ढग डवरले, स्वप्न डोळ्यात उद्याचे
रूप साजर्या घराचे, सुखावल्या अंगणाचे
वर ढग डवरले..... कुठे गेले...??
वर ढग डरवले.. आता दिसेनात कुठे
स्वप्न सारे झाले खोटे.. ओघळले डोळ्यावाटे
वर ढग डवरले... आता आभासच फ़क्त
सार्या नभातुन मुक्त, झाले आभाळ विरक्त??
वर ढग डवरले, वाजे कोरडा नगारा
कसा भेगाळ नजारा, त्यात दुष्काळी पहारा
वर ढग डवरले, आणि डोळ्यात टिपूस
नको अंत तू पाहूस, आता धाड ना पाऊस!
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा