कुणी कुणाचे ऐकुन घ्यावे?
कुणी कुणाचे ऐकुन घ्यावे?
मनांत सलही जोपासावे??
चंद्र दिसावा खिडकितून अन
चांदण्यांनी मजला छळावे
साथ तुझी ना मला लाभली
दु:खाला मी सोबत घ्यावे
मैफ़िलीतही रितेपणा हा
तुझ्या सयींनी मज घेरावे
चाहुल येता तुझी कुठेही
उरांत वादळ घुमून यावे
निशिगंधाने फ़ुलून येता
श्वासांनी घुसमटून जावे
आरशामध्ये चुकुन पाहता
माझे मलाच का मी भ्यावे?
- प्राजु
1 प्रतिसाद:
suekh! keval apratim!
टिप्पणी पोस्ट करा