रडून हासणे मीहि आता म्हणे शिकावे
रडून हासणे मीहि आता म्हणे शिकावे
खूप जाहले! मनांस आज मी ओळखावे
अपेक्षांचे ओझे इतुके खांद्यावरती
उतरवुन थोडे स्वप्नांमध्ये मी विहरावे
कशास पाहू वाट तुझी मी अरे वसंता?
तुझ्याविनाही मी बहरावे, फ़ुलून यावे
देवत्वाला, बाजूला तू ठेव जरासा
विटेवरी त्या किती काळ तू उभे रहावे?
पत्रे सारी पुन्हा चाळता मनांस वाटे
त्या सुगंधी क्षणांत फ़िरूनी तुज भेटावे
जनरितीची फ़ुले कागदी शोभून दिसती
गंधवीभोरी मनाने का त्यास भुलावे?
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा