आयुष्याच्या वाटेवरती ..
आयुष्याच्या वाटेवरती झाली सर्वस्वाची होळी
हृदयानेही मृत्यूला मग रोज घातली आरोळी
पहाट झाली म्हणता उगा डोळ्यांपुढे ही अंधारी
दृष्टी माझी देउन गेली भेट मला ही रात्र काळी
मृत्यूला मी भीक मागतो रोज कणकण मरण्यापरी
चुकली ना कधी तरी नशिबी तीच माझी रिक्त झोळी
किती पाहसी दिवास्वप्ने मंतरलेल्या आयुष्याची
कर्तव्याच्या चुलीत गेली राख होउनी स्वप्ने भोळी
खांद्यावरती ओझे कसले रोज वाहते इथे तिथे
बांधलेली मीच होती माझ्या आयुष्याची मोळी
- प्राजु
2 प्रतिसाद:
सुरेख लिखाण. आई च्या सगळ्या achievements पेक्षा तिला हे मोलाचे वाटेल ...संवेदनाक्षम मन, सहज लिहिणे आवडले ..
wish you the best
खूप खूप सुंदर!
टिप्पणी पोस्ट करा