शंखतीर्थ !!
तुझी आठवण येता , निळा डोह फ़ेसाळतो
पापण्याच्या तीरावर, भरतीचा पूर येतो..
क्षण निसटले जणू, मूठीतून जावी रेती
शिंपलीत नयनांच्या, भिजूनिया गेला मोती
गाज हृदयाची खोल, स्पंदनात तुझी सय
विरहाच्या लाटा उंच, वादळाचे मला भय
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे, नि आसवेही अव्यक्त
अस्ताचलास रे गेला, माझ्या आकांक्षेचा रवी
धूसरला चंद्र माझा, काळोखास बोल लावी
दूर दूर क्षितिजाला, भेटण्याची आस व्यर्थ
आठवांस अर्पिते मी, आसवांचे शंख तीर्थ
- प्राजु
2 प्रतिसाद:
amrutacha ghanu
basari-cha sur
shabd shabd moti
vyakta zaali hur hur
kaalajache thave
reshim ulgadave
spandanaanchya layila
bhashe che kondan labhave
ase he 'Shankh Tirth'
navhe sadaa amrut-anubhavaancha
shrimant hotil rasik
ha rinanubandh aathavaancha!!!
BRAVO praaju .. it's not only a poem but Bhav-Tirth
Apratim! Afat! Advitiy!
टिप्पणी पोस्ट करा