पौर्णिमा..
हृदयांत रंगलेल्या खेळात येशील का?
हा डाव प्रीतिचा गं तू पूर्ण करशील का?
बघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे
मज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का?
पाऊस घेत हाती मल्हार छेडतो मी,
होऊन धार मजला, तू चिंब करशील का?
दिवसांत कैकवेळा घेतो मिठीत तुजला
होऊन रातराणी श्वासात उरशील का?
भिजल्या अनेक रात्री बघ आठवांत तुझिया
ओलावल्या मनाने मज तू स्मरशील का?
दिधले मला सखे तू उद्दिष्ट जीवनाचे
ते ध्येय पूर्ण करण्या तू हात धरशील का?
हे पाहिले तुझ्या मी, डोळ्यांत स्वप्न माझे
घेऊन ते उराशी साकार करशील का?
- प्राजु
2 प्रतिसाद:
sundar ahe..fakta 'tu' chi jaga thodi badalun bagh..
sundar farch chhan
टिप्पणी पोस्ट करा