मंदिरी गर्भात तू, पडवीत मी!
राहते हल्ली म्हणे मस्तीत मी..
आज आहे नेमकी शुद्धीत मी
वेगळे अस्तित्व होते का मला?
नेहमी होते तुझ्या अंकीत मी
ओळखूनी पायरी मी वागले
मंदिरी गर्भात तू, पडवीत मी!
ना कधी जमले कुणा फ़टकारणे
सांग ना आणू कसे वृत्तीत मी?
तो पुन्हा येईल ना माझ्याकडे?
का अशी असते सदा धास्तीत मी?
पाहिले सरणावरुनी,.. वाटले
जीवना होते तुझी आश्रीत मी
चालले आहे जसे.. आहे बरे!
राहते माझ्या मना पढवीत मी
भेट ना मज त्या ठिकाणी तू पुन्हा
हीच इच्छा ठेवली यादीत मी
-प्राजु
आज आहे नेमकी शुद्धीत मी
वेगळे अस्तित्व होते का मला?
नेहमी होते तुझ्या अंकीत मी
ओळखूनी पायरी मी वागले
मंदिरी गर्भात तू, पडवीत मी!
ना कधी जमले कुणा फ़टकारणे
सांग ना आणू कसे वृत्तीत मी?
तो पुन्हा येईल ना माझ्याकडे?
का अशी असते सदा धास्तीत मी?
पाहिले सरणावरुनी,.. वाटले
जीवना होते तुझी आश्रीत मी
चालले आहे जसे.. आहे बरे!
राहते माझ्या मना पढवीत मी
भेट ना मज त्या ठिकाणी तू पुन्हा
हीच इच्छा ठेवली यादीत मी
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा