धुंद होते रातराणी चांद जातो मोहरुनी
धुंद होते रातराणी चांद जातो मोहरुनी
गूज वारा सांगतो सार्या जगाला दर्वळूनी
लावते मी सांजवाती अंगणी माझ्या मनाच्या
स्पंदनी झंकारती तारा नव्याने आठवांच्या
आणि ओठी आगळा मकरंद जातो पाझरूनी
गूज वारा सांगतो सार्या जगाला दर्वळूनी..
रोमरोमातून भिनते प्रेम श्वासा सोबतीने
काय झाले कोण फ़िरते, बोलते माझ्या वतीने?
- प्राजु
गूज वारा सांगतो सार्या जगाला दर्वळूनी
लावते मी सांजवाती अंगणी माझ्या मनाच्या
स्पंदनी झंकारती तारा नव्याने आठवांच्या
आणि ओठी आगळा मकरंद जातो पाझरूनी
गूज वारा सांगतो सार्या जगाला दर्वळूनी..
रोमरोमातून भिनते प्रेम श्वासा सोबतीने
काय झाले कोण फ़िरते, बोलते माझ्या वतीने?
मी अशी स्वप्नात की सत्यात? गेले गोंधळूनी
गूज वारा सांगतो सार्या जगाला दर्वळूनी
शब्द ओठीचे विरुनी मूक हा एकांत होतो
प्रीत लावण्यात न्हाते देहही विश्रांत होतो
मोगर्याचा गंध उरतो श्वास भिंती कोसळूनी
गूज वारा सांगतो सार्या जगला दर्वळूनी
गूज वारा सांगतो सार्या जगाला दर्वळूनी
शब्द ओठीचे विरुनी मूक हा एकांत होतो
प्रीत लावण्यात न्हाते देहही विश्रांत होतो
मोगर्याचा गंध उरतो श्वास भिंती कोसळूनी
गूज वारा सांगतो सार्या जगला दर्वळूनी
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा