स्वप्नं नाही सत्य असावे..
स्वप्नं नाही सत्य असावे
अन तुजला मी रोज पहावे
पत्र तुला मी रोज लिहिले
कधि तरी ते तूही लिहावे!!
स्वप्न पाहसी तू स्वप्नाचे
पण तुजला ना मी दिसावे??
तुला पाहूनी मनास वाटे
दर्पण माझ्या उरी असावे
माझे मी पण संपून जावे
फ़क्त तुझ्या मी मनी वसावे
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा