शनिवार, ५ एप्रिल, २०१४

वेगळी ग्वाही नको..

वाच माझे मन सख्या तू आणखी काही नको
हाच प्रेमाचा पुरावा वेगळी ग्वाही नको..

फ़क्त मी विसरुन जावे दु:ख माझे पळभरी
सौख्य गरिबासारखे दे मोजके,... शाही नको

पावसाची रम्य हिरवळ, अन वसंती रंगही
पाहु दे सारेच मोसम.. वर्षभर लाही नको!

मूक फ़ुलणे आज व्हावे, गलबला त्याचा नको
आपले आपण फ़ुलू... पाऊस-वाराही नको

चालले आहे बरे.. आनंद आहे.. क्षेमही
वेगळी आशा नको, नंतर निराशाही नको

-प्राजु

1 प्रतिसाद:

K P म्हणाले...

छान. मतला छान आहे.पूर्ण गझलही चांगली आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape